Published On : Mon, Jun 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील खैरी बस स्टॉपजवळ एमडी ड्रग विक्री करताना तिघांना अटक; सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर – कामठी-नागपूर रोडवरील खैरी बस स्टॉपजवळ न्यू शान-ए-पंजाब लॉजमध्ये एमडी सारख्या घातक मादक पदार्थांची विक्री करत असताना न्यू कामठी पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी या छाप्यात एकूण ४ लाख ८५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, हा प्रकार मध्यरात्री ११ वाजता घडला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या माहितीच्या आधारे तारिक परवेज मोहम्मद खुर्शीद, बिलाल नागानी, आणि मोहम्मद अनीस नागानी यांना खैरी बस स्टॉपजवळून ताब्यात घेण्यात आले.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छाप्यात ४६.७२ ग्रॅम एमडी पावडर (किंमत अंदाजे २ लाख ३३ हजार ६०० रुपये), ६ मोबाईल फोन, २ मोटारसायकल असा एकूण ४ लाख ८५ हजार ७२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

न्यू कामठी पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम ८(अ), २२(अ), २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे आरोपी आदतन गुन्हेगार असून, त्यांचा इतर मादक पदार्थांच्या तस्करीशीही संबंध असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी इतर आरोपींचाही शोध लावण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement