Advertisement
नागपूर : जगाच्या इतिहासात १४० लढाया करुन एकही लढाईत पराभव आणि तह न पत्करणारे महापराक्रमी, महान योद्धा, प्रजाहितदक्ष, न्यायी, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त संभाजी राजे यांच्या प्रतिमेला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. व अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहा. आयुक्त श्री. श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, स्वप्नील लोखंडे, जितेश धकाते, अंकित यादव उपस्थित होते.