नागपूर -आज सकाळी नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध रोचलदास कपड्यांच्या दुकानात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे परिसरात एकच अफरातफर उडाली.
पाच अग्निशमन गाड्यांची घटनास्थळी तात्काळ धाव-
घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.
लाखो रुपयांचे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही-
ही दुकान परिसरात अतिशय लोकप्रिय असून, आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे कपड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट-
सध्या आगीच्या कारणांची चौकशी सुरू आहे. ही आग अपघाताने लागली की घातपात होता, याबाबत तपास सुरू आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाली होती कारवाई-
अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ६ वाजल्यापासून बचावकार्य सुरू केले होते. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली.