नागपूर : सध्या सगळीकडे ‘छावा’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपट रिलीज होताच सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ’छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने हे पात्र जिवंत करत महाराजांच्या व्यक्तिरेखेला पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण एकीकडे भाजपसह आरएसएसचे छत्रपती संभाजी महाराजांप्रति प्रेम ऊतू चाललंय तर दुसरीकडे सावरकरांनी केलेल्या बदनामीचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सावरकरांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते? हे भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पटले का? असा सवालही विचारण्यात येत आहे.
गजाभाऊच्या पोस्टची चर्चा –
नुकतेच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटानंतर भाजपसह राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे लोकं छत्रपती संभाजी महाराजांप्रति आदराची भावना व्यक्त करत आहेत.मात्र सावकार यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या त्यांच्या बदनामीचे काय ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गजाभाऊ याच्या एका हॅण्डलरने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, ***** सावरकरने आपल्या हिंदू पदपादशाही पुस्तकात काय लिहिले ?? संभाजी महाराज नाकर्ते होते. श्रेष्ठ राष्ट्राची धुरा करण्यास ते अगदी अयोग्य होते. ते मोगलांचा विरोध करण्यास अयोग्य होते. आणि त्यांना दारूचा आणि महिलांचा शौक होता त्यांनी कुठेही संभाजी महाराजांना महाराज म्हटले नाही. त्यांनी शिवाजी महाराज बद्दल हि अपशब्द काढले आहेत. दोन दिवस झाले पेठेंडी भाजप भक्तांना अचानक संभाजी महाराजांवर प्रेम आले आहे प्रत्येक भाजप rss समर्थकला विचारा कि सावरकर बरोबर होते का ? प्रत्येक पुणेरी बामणाने महाराजांची बदनामी केली आहे, असे गजाभाऊ याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सावरकरांनी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची काय बदमानी केली –
महाराष्ट्रधर्म किती खोल रुजला आहे आणि महाराष्ट्रातील हिंदू पुनरुज्जीवनाची चळवळ त्याने किती उत्कटत्वाने चेतावली आहे याचा ठाव प्रत्यक्ष औरंगजेबास लागला नाही! इतर व्यक्ति निष्ठ किवा समाजातील विशिष्ट वर्गाने चालविलेल्या संक चित चळवळीप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची, शिवाजीमहाराजांसारखा कर्ता पुढारी कालवश झाल्याने आणि त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने, इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले. तेव्हा अर्थातच आपल्याला पाहिजे ती संधी आली आहे असे तो समजला. काबूलपासून बंगालपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण साम्राज्याची सर्व साधने, अगणित मनुष्यबल आणि द्रव्यबल त्याच्या हातात होती; एकदम सर्व प्रकारचे मिळून तीन लाख सैन्य घेऊन तो दक्षिणेत उतरला. शिवाजीमहाराजांनादेखील एकाच वेळी एवढ्या प्रचंड सैन्याशी तोंड द्यावयाचा प्रसंग कधी आला नव्हता.
भोसडीचा सावरकर आपल्या हिंदू पदपादशाही पुस्तकात काय लिहिले ??
संभाजी महाराज नाकर्ते होते.
श्रेष्ठ राष्ट्राची धुरा करण्यास ते अगदी अयोग्य होते.
ते मोगलांचा विरोध करण्यास अयोग्य होते.
आणि त्यांना दारूचा आणि महिलांचा शौक होता
त्यांनी कुठेही संभाजी महाराजांना महाराज म्हटले नाही.… pic.twitter.com/DYVDKPCr02— गजाभाऊ (@gajabhauX) February 17, 2025
औरंगजेबाचा तर्क काही चुकीचा होता असे नाही. अशा रीतीने एकत्रित केलेल्या मॉगली साम्राज्याच्या सर्व बलाचा भार अंगावर पडल्याबरोबर मराठ्यांच्या नवीन आणि विस्कळीत राज्याच्या दसपट मोठे राज्यही पार चुरडून गेले असते. तशात एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारीपण गेल्यामुळे ह्या वेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करर्ण अधिकच अशक्य झाले होते. नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजीमहाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्याविषयी अत्यंत आसक्ती ह्या दुर्गुणांची भर पडली होती.
शिवाजीमहाराजांनी संपादिलेली सर्व भौतिक संपत्ती समूळ नष्ट झाली होती. त्यांचा द्रव्यकोश रिता पडला होता; त्यांचे गड उध्वस्त झाले होते; त्यांची प्रत्यक्ष राजधानीसुद्धा परकीय शत्रूच्या हातात गेली होती! संभाजीला शिवाजीमहाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही; पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजीमहाराजांची नैतिक आणि आध्यत्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वलतर आणि बलशाली केली! हिंदू-धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले, असे सावकार यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
दरम्यान इतिहासात कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल लिहिणे हे त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून होते.मात्र आजकाल कोणीही कुणावरही चिखलफेक करण्यास मागेपुढे पाहत नाही. नेहमी आमचे सावरकर असे, आमचे सावरकर तसे, असे जगाला ओरडून सांगणाऱ्या भाजपासह आरएसएस आणि सावरकरप्रेमींनी आता बोलणे गरजेचे आहे.