Published On : Fri, Feb 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

…म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

Advertisement

नागपूर :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी सादर करत महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. गांधी यांच्या आरोपांवर पालमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्याने नाकारले. हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे.

खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले‘, असे सांगितले होते. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्याने ते सत्य स्वीकारणार नाहीत.

राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement