Published On : Fri, Jan 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ; हृदयस्पर्शी घटना,नागपुरात रागाने घर सोडलेल्या ‘बर्थडे बॉय’चा शोध अन् पोलिसांकडून सेलिब्रेशन!

नागपूर : खाकी वर्दीतल्या या माणुसकीचे आणि संवेदनशील मनाचे दर्शन देणारी नागपुरात घडली आहे. घरच्यांनी वाढदिवस साजरा करण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात घर सोडलेल्या दहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतून संचित अरविंद नरड नावाचा 10 वर्ष वयाचा मुलगा गुरुवार 30 जानेवारी रोजी श्रीराम नगर येथील राहत्या घरून सकाळी 11 वाजेपासून गायब झाला होता. मात्र तो बेपत्ता असल्याची माहिती तब्बल पाच तास उशिरा दुपारी 4 वाजता वाजता पोलीस ठाण्यात देण्यात आली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पालकांनी दिलेली तक्रार घेऊन तात्काळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आली. शोध मोहीम दरम्यान घटनास्थळाचे आजूबाजूला शोध घेत असताना ठिक 55 मिनिटांनंतर हा मुलगा स्वामीनारायण मंदिर परिसराजवळ शशिकांत आणि शैलेंद्रसिंग या दोन पोलिस हवालदारांना मिळाला.

या मुलाचे घरातून निघून जाण्याचे कारण ऐकून पोलिसांनी केक मागवत त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला. या मुलाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement