Published On : Tue, Jan 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

पारशिवनी येथील गोंडेगाव प्रकल्पाच्या कोळसा डंपिंग यार्डमध्ये वाघाचा मुक्त संचार;नागरिकांमध्ये दहशत

Advertisement

नागपूर: जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या वेकोलि कामठी उपक्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पातील कोळसा डंपिंग यार्डमध्ये एका वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. यामुळे WCL कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वेकोलि कामठी उप-क्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पादरम्यान रात्रीच्या वेळी वाघ मुक्तपणे फिरत असतो. तर WCL कामगारांना कोळसा खाण क्षेत्रात तीन शिफ्टमध्ये कामावर जावे लागते. त्यामुळे येथील कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Gold Rate
24 July 2025
Gold 24 KT 99,500 /-
Gold 22 KT 92,500 /-
Silver/Kg 1,15,500 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वेकोलि कामठी उपप्रादेशिक व्यवस्थापक शरद कुमार दीक्षित यांनी रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना पत्र लिहून वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement