Published On : Wed, Oct 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर;नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधून विशाल बरबटे यांना उमेदवारी

Advertisement

नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधून विशाल बरबटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये 15 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. याच जागेवरून उध्दव ठाकरे यांनी तगडा उमेदवार उभा केला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

Gold Rate
Feb 14th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,900 /-
Gold 22 KT ₹ 1,45,900 /-
Silver/Kg ₹ 2,48,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर वरळीतून आदित्य ठाकरे ,डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतू एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement