Published On : Tue, Sep 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी; पुढील तीन-चार दिवस अलर्ट

Advertisement

नागपूर : मान्सून आता परतीच्या तयारीला लागला असून नागपूरसह विदर्भाच्या काही भागात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागपूरकरांना उखाडयापासून दिलासा मिळाला आहे.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विदर्भात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, विशेषत: जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात याठिकाणी हजेरी लावली.

आता मान्सून माघार घेणार असतानाच विदर्भासह अनेक राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू असून, त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

Advertisement
Advertisement