Published On : Fri, Sep 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नंदनवनमध्ये जुन्या वादातून एकाची हत्या;दोघांना अटक

Advertisement

नागपूर : नंदनवन येथील एका खुनाच्या प्रयत्नाचे प्रकरण चव्हाट्यावर आले असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 27 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10:30 दरम्यान लोहाणा समाज भवन, हिवरी नगर जवळ घडली.

आरोपी निहाल नरेंद्र शेंडे (वय 22) व नादिर खान आतिक खान पठाण (वय 27) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उमेश गंगाधर काळबांडे (वय 30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जुन्या वादातून आरोपींनी काळबांडे याला अमानुष मारहाण केली.

Gold Rate
02 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,200/-
Gold 22 KT ₹ 1,40,600 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यात तो गंभीर जखमी झाला तातडीने त्याला न्यू इरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय प्रयत्न करूनही 5 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

फिर्यादी उमेशचा भाऊ आकाश गंगाधर काळबांडे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement