Published On : Wed, Jul 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर भरकटले !

पायलटच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली

नागपूर : नागपूर ते गडचिरोली प्रवासात पावसाळी ढगांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. पायलटने प्रसंगावधान दाखवित सुखरुपपणे हेलिकॉप्टर उतरविल्याने मोठी हानी टळली.

या हेलिकॉप्टरमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवारही उपस्थित होते.खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे मोठी दूर्घटना टळली.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चार महत्त्वाचे नेते या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यावेळी हेलिकॉप्टर भरकटले होते. गडचिरोलीत खराब हवामानाचा फटका त्यांना बसला होता. पण, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत.

हेलिकॉप्टर सुरुवातीला व्यवस्थित उडाले. पण ते नंतर भरकटले. हेलिकॉप्टर ढगात गेलं होते. पण, देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत होते, असं अजित पवार म्हणाले आहेत. सुदैवाने पायलटने कौशल्य दाखवत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले. त्यानंतर दोन्ही उपमुख्ममंत्र्यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Advertisement
Advertisement