Published On : Tue, Jul 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

Advertisement

मुंबई -डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 40 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले. पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला.

डोंबिवली मधील दोन ते तीन गावामधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एका बसच्या पुढून ट्रॅक्टर जात होता.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस २० फूट खाली कोसळली.यात बसमधले तीन भाविक जागीच ठार झाले.

तर ट्रॅक्टरमधल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर ४० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील सात प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement