मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. 543 पैकी एनडीएचे 293 खासदार जिंकले तर इंडिया आघाडीचे 234 खासदार आलेत.दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं य़श मिळाले असून भाजपला मात्र जबर फटका बसला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक निकालावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
वाराणसीत नरेंद्र मोदींना विजयासाठी संघर्ष करावा लागला. मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा. मोदींनी आधी शपथ घेऊ द्या. शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते. नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, असे म्हणत राऊत यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
मोदींचं सरकार चालणार नाही, टिकणार नाही. लोकं तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तुमच्यापुढे झुकलो नाही, झुकणार नाही. मोदींना तिसऱ्यांदा आपल्या नावावर शपथ घ्यायचा विक्रम करायचा आहे तो करू द्या. मोदींनी शपथ घेऊद्या. शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते. नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला. बहुमत मिळाले नाही म्हणजे तुमचा ब्रँड संपला आहे, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.