Advertisement
नागपूर : हिंगणा रोडवरील अंबाझरी डायव्हरसिटी पार्कच्या फिल्टर प्लाँटजवळ गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. हा जंगलसदृश्य भाग असल्याने यापूर्वीही या भागात आग लागली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच त्रिमूर्तीनगर, सिव्हीललाईन, नरेंद्रनगर, सक्करदरा अग्निशमन केंद्राबरोबरच वाडी नगरपरिषदेतूनही फायर टेंडर घटनास्थळी रवाना करण्यात आले. पहाटे ३.४५ वाजता आग विझवण्यात अग्निशमन पथकाला यश आले. या आगीत अंदाजे ५ हेक्टरवरील जंगलातील गवत जळाल्याचा अंदाज आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान नागपूरच्या तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे शहरात आगीच्या घटनाही वाढल्या आहेत.