Advertisement
नागपूर : शहरात सलग चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली.आज बुधवारी दुपारी ३ वाजून ५९ मिनीटांनी २.४ रिक्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला. नागपूर जवळील कामठी भागात भूकंपाचे केंद्रे होते.हे धक्के अतिशय सौम्य असून, त्याची जाणीवही नागरिकांना झाली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे महिनाभराच्या अंतरात हा भूकंपाचा चौथा धक्का होता. यापूर्वी २७ मार्चला अशाचप्रकारे दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी भागातच दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद भूकंप विज्ञान विभागाने केली होती. त्यानंतर ५ मे रोजीही दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झाली. त्यावेळीही नागपूर परिसरात 2.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली. भूकंपाची 2.4 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसल्याचेही सांगण्यात येत आहे .