Published On : Mon, May 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

स्वतः शेणात तोंड बुडवायचे अन्….संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

नागपूर : मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करु नये अशी भूमिका घेतली.यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले.

मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करु नये अशी भूमिका घेतली. त्यावर महाराष्ट्राच सरकार, मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली. मराठी माणसाचा आवाज राहू नये, याच कारणासाठी मोदी-शाह यांनी ही शिवसेना फोडली असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिवसेना शिंदेगट हे स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवततात, खरी शिवसेना म्हणवतात पण ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची गां** शिवसेना गप्प आहे. हिंमत असेल आवाज द्या, आम्ही बघतो काय करायचं ते. रविवारी बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपरच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखले, ही फडणवीसांची बुळचट शिवसेना काय करते? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर आरोप करण्याआधी आमचे ४० आमदार का फोडले ते सांगावं. त्यावर काहीही बोलत नाहीत. शरद पवारांचे ४० आमदार का फोडले हे पण सांगावं. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा ही देवेंद्र फडणवीसांची वृत्ती आहे. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा हे फडणवीसांचं धोरण आहे,असा घणाघात संजय राऊत केला.

Advertisement
Advertisement