सावनेर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावनेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही.
विरोधकांकड़े ना बॉलर आहेत ना बॅट्समन जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू,असा घाणघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केला.
सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.गेल्या १० वर्ष आपण मोदींची बॅटींग पाहिली.त्यांनी देशाचा विकास केला.
आता पुढची पाच वर्ष पंतप्रधान मोदी चौकार,षटकार मारुन विरोधकांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय रहाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झाला असल्याचेही शिंदे म्हणाले.










