Published On : Sun, Jan 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सेंट जोसेफ, विद्यानिकेतन थ्रोबॉलमध्ये अजिंक्य खासदार क्रीडा महोत्सव

Advertisement

नागपूर. सेंट जोसेफ आणि विद्यानिकेतन संघाने प्रतिस्पर्धकांना पराभवाचा धक्का देत खासदार क्रीडा महोत्सवातील थ्रोबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. दिघोरी येथील बिरसा मैदानामध्ये गुरूवारी (ता.25) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

मुली आणि मुलांच्या गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटात सेंट जोसेफ आणि प्रोव्हिडन्स जी.एच. यांच्यात चुरशीची अंतिम लढत झाली. यामध्ये सेंट जोसेफ संघाने 15-7, 7-15, 15-9 असा सामना जिंकून जेतेपद पटकावले. मुलींच्या गटात तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात सेंट उर्सुला संघाने सीडीएस वर 15-12, 15-3, 15-10 ने विजय मिळविला.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुलांच्या गटामध्ये विद्यानिकेतन संघाने ई-पाठशाला संघाचा 18-16, 15-9 ने पराभव करून विजेतेपदाचे चषक पटकावले. तर तिस-या स्थानासाठीच्या सामन्यात एसओएस संघाने सीडीएसचा 15-8, 15-4 असा एकतर्फी पराभव करून विजय मिळविला.

निकाल

मुली

अंतिम लढत : सेंट जोसेफ मात प्रोव्हिडन्स जी.एच. (15-7, 7-15, 15-9)

तिसरे स्थान : सेंट उर्सुला मात सीडीएस (15-12, 15-3, 15-10)

मुले

अंतिम लढत : विद्यानिकेतन मात ई-पाठशाला (18-16, 15-9)

तिसरे स्थान : एसओएस मात सीडीएस (15-8, 15-4)

Advertisement
Advertisement