Published On : Mon, Jan 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांनी RSS मुख्यालयाला 28 मार्चपर्यंत ‘नो-ड्रोन झोन’ म्हणून केले घोषित !

Advertisement

नागपूर: नागपूर पोलिसांनी संभाव्य ड्रोन हल्ल्यांपासून महत्त्वाच्या प्रतिष्ठानांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना तीव्र केल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नागपूरच्या महाल भागातील मुख्यालयाला ‘नो-ड्रोन’ झोन म्हणून घोषित केले. संभाव्य धोका टाळण्यासाठी 28 मार्चपर्यंत परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घातली.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 (1) (3) अंतर्गत 28 जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात, पोलीस सहआयुक्त अस्वती दोरजे यांनी सांगितले की, RSS मुख्यालय हॉटेल, लॉज आणि कोचिंगने वेढलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरात आहे. यामुळे, आजूबाजूच्या परिसरातून जाणारे लोक फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकतात किंवा ड्रोन व्हिडिओग्राफीचा वापर करू शकतात, ज्यामुळे मुख्यालयाला धोका निर्माण होऊ शकतो.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा) अंतर्गत कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. हा आदेश या वर्षी 29 जानेवारी ते 28 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

आरएसएसचे मुख्यालय दीर्घकाळापासून दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिले आहे. 1 जून 2006 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना इमारतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना पोलीस कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली होती.

तेव्हापासून मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याच बरोबर, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ सुरक्षा दलांवर नजर ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी नक्षलवादी छोट्या ड्रोनचा वापर करत असल्याच्या गुप्त माहितीबाबत पोलीस सतर्क आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement