Published On : Sat, Jan 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर कारागृहातील कैद्यांना त्वचाविकार टाळण्यासाठी ‘वॉशिंग मशीन’ची सुविधा !

Advertisement

नागपूर : कारागृहातील कैद्यांना आरोग्यविषयक मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे असते. दिवसेंदिवस कैद्यांना आरोग्यासोबतच त्वचाविकारासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे लक्षात घेता त्वचेच्या वाढत्या आजारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाने प्रथमच कैद्यांना कारागृहांमध्ये वॉशिंग मशिनची सुविधा उपलब्ध करून दिली.यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सुरू करण्यात आला.

त्याच धर्तीवर आता नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कैद्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यविषक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कैद्यांमधील त्वचाविकार विचारात घेऊन दैनंदिन वापरातील कपड्यांची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागपूर कारागृह प्रशासनाकडूनही कैद्यांसाठी वॉशिंग मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तुरुंगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सर्व तुरुंगांनी १९३ वॉशिंग मशिन्सची ऑर्डर दिली आहे. वॉशिंग मशिनच्या वापराच्या परिणामाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर त्याच्या आधारे आवश्यकतेचा विचार करून नजीकच्या काळात सर्व कारागृहांमध्ये तब्बल 325 वॉशिंग मशिन बसवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे नमूद करणे उचित आहे की राज्यातील कारागृहांमध्ये प्रचंड गर्दीमुळे कैद्यांमध्ये त्वचेचे आजार वाढले आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृह हे कैद्यांसाठी वॉशिंग मशीन असलेले महाराष्ट्रातील पहिले कारागृह ठरले आहे.

संसर्ग टाळण्यास होणार मदत –
येरवडा कारागृहात धुलाई यंत्र कार्यान्वित केल्यानंतर राज्यातील अन्य कारागृह प्रशासनाने वॉशिंग मशीनची मागणी केली. यामुळे कैद्यांचे नियमित चादर, सतरंजी, कपडे धुलाई केल्यास संसर्ग टाळणे शक्य होईल.त्यामुळे नागपूर कारागृहाकडून वॉशिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी
राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये कैद्यांची गर्दी असते. हेच कारण त्वचेचे आजार वाढण्यास कारणीभूत असल्यापैकी एक आहेत. प्रतिबंध म्हणून, त्यांचे कपडे आणि अंथरुण योग्य प्रकारे धुवून निर्जंतुक करणे आवश्यक आहे. या समस्येला आळा घालण्यासाठी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगाने कैद्यांसाठी वॉशिंग मशिन वापरण्यास सुरुवात केली होती आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील अनेक कारागृह प्रशासन याच वाटेवर आहेत.

एकट्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात सध्या 1,027 जादा कैदी बंद असल्याने मध्यवर्ती कारागृहातील गर्दीचा प्रश्न संपलेला दिसत नाही. कारागृहाची क्षमता 1,940 कैद्यांची असली तरी सध्या 2,967 कैदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहाची रचना 1,798 पुरुष आणि 142 महिलांसाठी केली आहे; मात्र, सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात 2,870 पुरुष आणि 97 महिला कैदी आहेत.

सध्या, महाराष्ट्रात सुमारे 25,000 कैद्यांच्या एकत्रित क्षमतेसह 60 कारागृहे कार्यरत आहेत. तथापि, सध्या कैद्यांची वास्तविक संख्या 42,000 इतकी आहे, जी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त आहे.

– शुभम नागदेवे

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement