नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ईव्हीएमसंदर्भात मोठे विधान केले आहे. सध्याच्या स्वरूपातील ईव्हीएम असेपर्यंत भाजपला सत्तेतून हटवता येणार नाही, असे भाष्य मलिक यांनी केले.
ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी त्यांच्या यूट्युबवरील दिल से या कार्यक्रमात मलिक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मलिक यांनी ईव्हीएमसंदर्भात भूमिका मांडली. विरोधकांनी निवडणुकांत ईव्हीएमच्या मुद्द्यावरून रान पेटवले. मात्र निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याने तयार कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
निवडणूक आयोगाची भूमिका अयोग्य आहे. साशंकता असेल तर मतपत्रिकांचा वापर का केला जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. मतदानानंतर व्हीव्हीपॅट पावत्या मतदारांकडे सोपवल्या जाव्यात. त्या पावत्या मतदार मतपेट्यांमध्ये टाकतील. नंतर त्यांची मोजणी होईल,असेही मलिक म्हणाले.