Published On : Thu, Jan 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर… श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आव्हाडांकडून दिलगिरी !

Advertisement

शिर्डी : प्रभू रामचंद्र मांसाहार करत असल्याचे वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.अखेर यावर आव्हाड यांनी माफी मागितली. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही, पण आजकाल अभ्यासाला नाही भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरानिमित्त शिर्डीत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना मी म्हटले की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही, पण जे याविरोधात उभे राहिले, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की वाल्मिकी रामायणात सहा कंद आहेत. अयोध्या कंदातील सर्ग २२, ५२ श्लोक १० मध्ये याबाबत उल्लेख आहे, असे आव्हाड म्हणाले.

Gold Rate
06Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,300 /-
Gold 22 KT ₹ 1,11,900 /-
Silver/Kg ₹ 1,48,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आमचा राम सत्यासाठी १४ वर्ष वनवासात गेला होता, तो आम्हा बहुजनांचा आहे, तुम्ही त्याचं अपहरण करता. राम आमच्या हृदयात आहे, फक्त तोंडात नाही. तुम्हाला तुमचा राम निवडणुकांसाठी बाजारात आणायचाय, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात असल्याचे आव्हाड म्हणाले.

दरम्यान मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कुठल्याही गुन्ह्याला घाबरत नाही, जर कुणाला लॉजिकली बोलायचे असेल तर या, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Advertisement
Advertisement