Published On : Thu, Nov 16th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या !

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय

गडचिरोली : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे भेट देऊन स्थानिक आदिवासी व पोलीस जवानांसोबत सण साजरा केला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. दिनेश पुसू गावडे (२७, रा. लाहेरी ता. भामरागड) असे मृत तरुणाचे आहे. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी त्याला ठार मारल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या पेनगुंडा गावात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दिनेश हा लाहेरीवरून १५ नोव्हेंबरला पेनगुंडा येथे गेला होता. रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी दिनेशची निर्घृण हत्या केली.हत्येनंतर घटनास्थळी एक पत्रक आढळून आले. यात नक्षलवाद्यांनी नमूद केले आहे की, दिनेश हा पोलीस खबरी असल्याने त्याला ठार मारण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी नक्षलवाद्यांचा हा दावा फेटाळला आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातून नक्षलवादी हद्दपार झाल्याचे म्हटले होते. परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात पुन्हा नक्षलवादी सक्रिय असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान घटनेप्रकरणी धोडराज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मृत तरुणाचा मृतदेह आज गुरुवारी सकाळच्या सुमारास शवविच्छेदनसाठी भामरागड येथे नेण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement