नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले असुन कामठी, मौदा विधानसभा मतदार संघातील एकुण ४२ क्षेत्रात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यात२७ ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी समर्थित उमेदवारां चा विजव झाला त्यात कामठी क्षेत्रात १० पैकी चिकना, कवढा, बाबुळखेडा , नेरी,आणि वरंभा अशा एकुण ५ ठिकाणी तर मौदा क्षेत्रातील इंदौरा, आदासा पिंपरी, बोरगाव, अडेगाव, घोड मुंढरी , पिंपळगाव , आजनगाव , भांडेवाडी , तोंडली , बेरडेपार, नाना देवी ,लापका , खराडा ( पू) अशा २४ पैकी १५ तर नागपुर ग्रामिण अंतर्गत सालई गोधनी , विहीरगांव , कळमना, हुडकेश्वर, पांजरी लोधी, वेळा हरिशचंद्र , चिकना अशा ८ पैकी ७ जागा अशा एकुण २७ ग्रामपंचायतीत भा ज पा समर्थित उमेदवारांचा दणदणीत विजय झाला संपूर्ण क्षेत्रात आ टेकचंद सावरकर यांनी गावोगावी केलेल्या विकास कामाची ही पावती असल्याचे म्हंटले जाते .
Published On :
Mon, Nov 6th, 2023
By Nagpur Today
आ टेकचंद सावरकरां च्या विकास कार्याचा दणदणीत विजय
Advertisement