नागपूर : गोरेवाडा रोड येथील गोकुळ हाऊसिंग सोसायटीच्या बोरगाव कान्हा रेंजन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आज पहाटे सकाळी ४ वाजताच्या सुमारास बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये हा बिबट्या पाळीव कुत्र्याच्या मागे धावतांना दिसत आहे. मात्र बिबट्याने कुत्र्यावर कोणताही हल्ला वगैरे केलेला नाही. उलट तो त्याच्यासोबत खेळत असल्याचे दिसत आहे.
कान्हा रेंजन्सीच्या इमारतीत नागपूर शहर पोलीस विभागात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल अभिषेक कश्यप देखील राहतात. त्यांनीही या घटनेसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला.
इमारतीच्या पार्किंगमध्ये बिबट्या घुसला हे सर्वप्रथम त्याठिकाणी कामावर असलेल्या वॉचमन ने पहिले. तसेच बिबट्या ज्या पाळीव कुत्र्याच्यामागे लागला तो सीलम नावाचा महिलेचा आहे.
गोरेवाडा रोड येथील गोकुळ हाऊसिंग सोसायटीच्या परिसराच्या आजूबाजूला डिफेन्स विभागाची जमीन असून याठिकाणी घनदाट जंगल झाले.
या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांच्या वतीने वनविभागाला देण्यात आली. यानंतर गोकुळ सोसायटी, मजिदाना कॉलनी ,पटेल नगर, फ्रेंड्स कॉलनी, बोरगाव, मकड धोकडा
परिसरातील लोकांना वनविभागाने सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक कामासाठी घराबाहेर निघण्याचे आवाहन केले आहे.
– रविकांत कांबळे