Published On : Thu, Sep 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या वृद्धाला ७ वर्षांची शिक्षा !

Advertisement

नागपूर : विविध आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत गर्भवती केल्याप्रकरणी ६२ वर्षीय वृद्धाला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी आरोपी वृद्धाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. श्रीराम रामजीवन शर्मा (रा. यशोधरानगर) असे आरोपी वृद्धाचे नाव आहे.

माहितीनुसार, पोलिसांनी श्रीरामविरुद्ध २८ जुलै २०१७ रोजी २१ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार परिसरातच राहणाऱ्या श्रीरामने नोव्हेंबर २०१६ ते १ जुलै २०१७ दरम्यान तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला.आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन तो पीडितेला घाबरवत होता. बदनामीची धमकी देत होता. या दरम्यान पीडितेच्या पोटात दुखू लागले.

ती डॉक्टरकडे गेली असता ६ महिन्यांनी गर्भवती असल्याचे समजले.याप्रकरणाची तिने पोलिसात तक्रार केली. यानंतर आरोपी श्रीराम फरार झाला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Advertisement
Advertisement