Published On : Mon, Aug 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ट्रॉली बस सेवा लवकरच होणार सुरु ;नितीन गडकरींची माहिती

Advertisement

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे संकेत देत शहरात लवकरच ट्रॉली बस सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. या सेवेच्या माध्यमातून शहराचा चौफेर प्रवास होणे सुलभ होईल.

गडकरी यांच्या अथक प्रयत्नानंतर मेट्रो सेवा नागपुरात आली. मात्र ही सेवा शहराच्या काही प्रमुख भागांनाच जोडते, शहरातील अनेक वस्त्या या मेट्रोच्या नेटवर्कमध्ये येत नाही. त्यांना मेट्रोसोबत जोडतानाच त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था म्हणून गडकरी यांनी ट्रॉली बस सेवेचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोधनी येथील केंद्र सरकारच्या अमृत रेल्वे स्थानक विकास कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपये दिले आहेत. यातून लवकरच बससाठी केबल लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात येईल. . ही बस काटोल नाक्यापासून सुरू होईल.

तेथून एमआईडीसी हिंगना टी-पॉइंट, तेथून वळण मार्गाने (रिंगरोडने) छत्रपती चौकात येईल. तेथून कळमना (पूर्व नागपूर) – कामठी रोड (उत्तर नागपूर) व तेथून छिंदवाडा मार्गाने काटोल नाक्यावर परत येईल. या बसमुळे ज्या भागात मेट्रो सेवा नाही तेथील नागरिकांना वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळणारे असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच शहरात धावणाऱ्या सच्या तुलनेत ट्रॉली बसचे भाडे ३० टक्के कमी असणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement