नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठ्या दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयात मोदी आडनाव बदनामी प्रकरणात गांधीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की राहुल गांधी यांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कुठला आधार वापरण्यात आला. राहुल गांधींना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकत होती. न्यायाधीशांनी 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा दिली असती तर त्यांना (राहुल गांधी) संसदेत अपात्र ठरले नते नसते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.सुरत येथील सेशन कोर्टाने २३ मार्च रोजी राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवल होते. यासोबतच त्यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलार येथे 13 एप्रिल 2019 ला एका प्रचारसभेत म्हटलं होतं की “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव सारखंच का आहे? सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?”. राहुल गांधींच्या या विधानाविरोधात भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात कलम 499, 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.










