Published On : Mon, Jul 31st, 2023
By Nagpur Today Nagpur News

दाभोलकरांसारखी गत करू; काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी

Advertisement

अमरावती : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘दाभोलकरांसारखी गत करू,’ अशी धमकी देण्यात आल्याची माहिती स्वतः ठाकूर यांनी दिली.

मनोहर कुलकर्णी हे सगळीकडे फिरत आहेत. पण, मला दाभोलकरांची जशी गत केली, तशी तुमची करू, अशी धमकी देण्यात आली. महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल काहीही वक्तव्य केली जातात. आम्ही ***खोर म्हणलं, तर धमकी दिली जाते, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपमुख्यामंत्री देवेंद फडणवीस यांनी आम्हाला यात ओढू नका, असे म्हटले. तर दुसरीकडे मरावतीचे राज्यसभा खासदार आमच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले होते. आमचा जीव गेला तरी चालेल, पण यांचं सर्व उघड करणार आहे. माझ्या जीवाला काही झालं, तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भिंडेंना प्रोस्ताहन देण्यात येत आहे. भिडेंना पोलीस सुरक्षा देत आहेत. मात्र, आम्हाला नाही, असेही म्हणत यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

Advertisement
Advertisement