मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
जमावाकडून महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूर हिंसाचाराची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे.
मागील गेल्या २४ तासांत मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत असून वातावरण चिघळले आहे.










