नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार ता. 15) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे आराध्या इन्टरप्राईजेस, बुधवार बाजार, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे भाग्यलक्ष्मी क्लिनीक, टेलीफोन एक्सचेंज् चौक, नागपूर यांच्यावर सामान्य कचाऱ्यासह जैव कचरा टाकल्याबाबत कार्यवाही करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. कनोजिया क्लिनीक, सतनामी नगर, नागपूर यांच्यावर
औषधींचा कचरा रुग्णालयात पसरविल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.