Published On : Sat, May 20th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मानकापूरमध्ये सायबर चोरटयांनी महिलेची 8.97 लाखांनी केली फसवणूक

नागपूर: बँक मॅनेजर असल्याचे दाखवून सायबर चोरट्याने केवायसी तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने 58 वर्षीय महिलेची 8.97 लाखांनी फसवणूक केल्याची माहिती आहे.

जुने मानकापूर येथील रहिवासी असलेल्या शोभा प्रभाकर काळे या पीडित महिलेला 16 फेब्रुवारी 2023 रोजी तिच्या मोबाईलवर कॉल आला. मी बँक मॅनेजर असल्याची बतावणी करून, कॉलरने तिला केवायसी तपशील अपडेट करणार असल्याचे म्हटले.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केवायसी पडताळणीसाठी पासवर्ड (OTP) मिळेल असे भामट्याने त्या महिलेला सांगितले. शोभाला तिच्या सेल फोनवर ओटीपी मिळाल्यानंतर, तिने तो बँक मॅनेजर असल्याचा विश्वास ठेवून त्याला दिला . त्यानंतर लगेचच तिच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून तसेच पेन्शन खात्यातून ३.९७ लाख रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक करणार्‍याने तिच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एफडी पावत्यांवर 5 लाख रुपयांचे कर्जही घेतले.

पीडितेच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420 अन्वये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(c)(d) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Advertisement
Advertisement