Published On : Sat, May 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

पारडी येथे पोलीस स्टेशनचे भूमिपूजन

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पारडी येथील पोलीस स्टेशनचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.12) आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले.

याप्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार श्री कृष्णा खोपडे, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, मोहन मते, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, पोलीस महासंचालक श्री रजनीश सेठ, पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ श्री संदीप बिष्णोई, नागपूर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय गुल्हाने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास या घटकाखाली मौजा पारडी, भरतवाडा, पूनापूर व भांडेवाडी क्र. १, येथील १७३० एकर क्षेत्राकरिता प्रारुप व प्राथमिक नगर रचना परियोजना शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. शासनामार्फत मंजूर प्राथमिक नगर रचना परियोजने अंतर्गत मौजा पुनापूर : मधील नगर भूमापन क्रमांक १५० (पै.), १७३ (पै.) व मौजा भांडेवाडी मधील नगर भूमापन क्रमांक २३७ (पै.) या भूखंडावर, अंतिम भूखंड क्र. ३१० पोलीस स्टेशन / फायर स्टेशन’ हे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. लोकहितार्थ उक्त आरक्षणाखालील १७,०८७ चौ. मी. (४.२२ एकर) जमिनीचा ताबा खालील जमीन मालकांमार्फत नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड (NSSCDCL), नागपूर यांना विनामोबदला दिल्याबद्दल आभारपत्र मान्यवरांच्या हस्ते श्री. प्रसन्न दिलीप ढोक, श्री. विनय श्यामसुंदर सारडा व इतर आणि श्री. अनिलकुमार रामप्रताप सारडा व इतर यांना देण्यात आले. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार देवेन पाडगल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर प्रकल्प 12,160 वर्ग मीटर मध्ये तयार होणार असून त्याला तळमजला व त्यावर 2 मजले राहतील. प्रकल्पासाठी एकूण 9,33,58,820 रुपये निधी प्रस्तावित आहे.

Advertisement
Advertisement