नागपूर : सीताबर्डीचा ऐतिहासिक किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी 1 मे रोजी खुला ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरकर सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊ शकतात. किल्ल्यावर प्रवेश हा रेल्वे स्थानकासमोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून होईल, अशी माहिती विंग कमांडर रत्नाकर सिंग, संरक्षण पीआरओ नागपूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
दरम्यान आप्पासाहेब भोसले यांच्या सैन्याने तीन दिवस दिलेल्या लढ्यानंतर २८ नोव्हेंबर १८१७ ला हा किल्ला ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात गेला. त्यावेळी येथे किल्ला नव्हता. त्याला ‘बडी टेकडी’ संबोधले जात होते . पुढे ब्रिटिशांनी त्याला किल्ल्याचे स्वरुप दिले. आज या किल्ल्यावर भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेनेची ११८ वी तुकडी सुमारे ५०० सैनिकांसह तैनात आहे.