Published On : Tue, Apr 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नाईक तलावातून हलविण्यात आलेल्या कासवाला टीटीसीमध्ये हवी मोठी जागा !

Advertisement

नागपूर : तब्बल 45 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) पथकाने नाईक तलावात असलेल्या कासवाचे रेस्क्यू करत त्याला नागरी अधिकारी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, सेमिनरी हिल्स (टीटीसी)मध्ये हलविले आहे. या कासवाला तलावातून काढण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कासवाचे वजन सुमारे ७० किलो असून ते जळवळपास चार फूट आहे.

नाईक तलावातून कासवाला हलविण्याचा प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. भोंसले राजवटीत कासवाची स्थापना झाल्यापासून ते तलावात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे,असेच अधिकाऱ्यांनी सांगितले. तलावाच्या काठावर एक छोटेसे हनुमान मंदिर आहे. कासव बाहेर पडायच आणि मंदिराजवळ काही काळ थांबायचा. हा देवाचा चमत्कार असल्याचे रहिवाशांनी आम्हाला सांगितले. या कासवाने कधीच कोणाचे नुकसान केले नाही. 1 मार्च रोजी तलावातील गाळ काढण्याच्या कामात हे कासव पहिल्यांदा दिसले होते. पाण्याची पातळी कमी झाल्याने रविवारी कासवाला रेस्क्यू करण्यात आले.

Gold Rate
06 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,300 /-
Gold 22 KT ₹ 1,19,300 /-
Silver/Kg ₹ 1,80,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यादरम्यान वन आणि एनएमसी टीमने स्थानिकांना शांत केले . हा कासव किमान सहा महिने TTC मध्ये असेल.

वन्यजीव पशुवैद्य डॉ राजेश फुलसुंगे, डॉ सुदर्शन काकडे आणि डॉ पंकज थोरात हे कासवाचे निरीक्षण करत आहेत.वन अधिकार्‍यांनी पुष्टी केली की लीथचे सॉफ्टशेल कासव (निल्सोनिया लेथिई) हे गोड्या पाण्यातील मऊ कवच असलेले मोठे कासव आहे जे द्वीपकल्पीय भारतासाठी स्थानिक आहे आणि नद्या आणि जलाशयांमध्ये आढळतात. 30 जून, 2021 रोजी, हीच प्रजाती हिंगणा येथील निवासी वसाहतीमधून वाचवण्यात आली . त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Advertisement
Advertisement