Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत ८१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७ कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात दररोज घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या पुन्हा एकदा १,००० च्या पुढे गेली आहे.
काल तब्बल १,३२३ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी ८१ जण पॉझिटिव्ह आहे. चाचणी पॉझिटिव्हिटी दर आता ६ टक्क्यांच्या च्या जवळ आहे. तर एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हेच पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांच्या जवळपास होते. सध्या एकूण ८१२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून यातील ४० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.