Published On : Wed, Mar 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.14) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत सी.ए.रोड येथील अर्पण सेल्स आणि अग्रवाल हार्डवेअर या दोन्ही दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न.05, बिनाकी ले-आऊट, आनंद नगर येथील यश सोनपापडी फॅक्ट्री आणि तांडापेठ, पाचपावली येथील खाडे ट्रेडर्स या दोन्ही दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Gold Rate
29 May 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver/Kg 98,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याचप्रमाणे मंगलवारी झोन अंतर्गत बॅरामजी टाऊन, पागलखाना चौक येथील गोल्चा बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement