नागपूर : पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आता आज पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये ’50 खोके एकदम ओके’ चे बॅनर घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी कर्नाटक सरकारविरोधातही घोषणा दिल्या.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर बॅनर आणि फलक घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार, अंबादास दानवे, धनंजय मुंडे आक्रमकपणे घोषण देत होते. यावेळी जयंत पाटील, आदित्य ठाकरे सुद्धा सामील झाले होते. मागे पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी 50 खोके एकदम ओके घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी आमदार आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली होती.
दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्युरोने हे पत्रक काढले आहे. सुरजागड या ठिकाणी आदिवासींचा पूजा स्थळ असतानाही स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता 2014 मधील भाजप सरकारने स्थानिक आदिवासींच्या तत्कालीन जनसंघर्षला चिरडून टाकत सुरजागड खाणीत खोदकाम सुरू केले होते. शेकडो हेक्टर क्षेत्रात खोदकामामुळे परिसराची प्रचंड पर्यावरणीय हानी होत असून सर्व प्रकारचा प्रदूषण ही वाढला आहे, असे असताना सुरजागड मधून आतापर्यंत दरवर्षी तीन मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी असताना आता सरकारने दर वर्षी दहा मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी बहाल केली आहे.