Published On : Thu, Nov 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा

Advertisement

नागपूर : स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.२१) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Committee) बैठक पार पडली.

बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चे सहा.प्राध्यापक डॉ. प्रविण सलामे, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ.अंजुम बेग, सदर रोग निदान केन्द्र, डॉ. संजय गुज्जनवार वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालय आदी उपस्थित होते.

Gold Rate
04 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,300 /-
Gold 22 KT ₹ 1,19,300 /-
Silver/Kg ₹ 1,79,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

या बैठकीमध्ये नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयित स्वाईन फ्लू रुग्ण व त्यातील बाधित या सर्वांचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर एकूण 2 स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता 2 मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले. यात नागपूर शहरातील 66 वर्षाची व 72 वर्षाच्या महिला आहेत.

576 रुग्ण स्वाईन फ्लू मुक्त
नागपूर शहरात आतापर्यंत 654 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी मनपा हद्दीतील 21, जिल्हा क्षेत्रातील ९, नागपूर जिल्ह्याबाहेरील १८ आणि इतर राज्यातील १४ असे एकूण 62 रुग्ण स्वाईन फ्लू मुळे मृत्यूमुखी पडले आहेत. स्वाईन फ्लू बाधित रुग्णांपैकी नागपूर शहरातील 354, नागपूर ग्रामिण मधील 114 आणि जिल्ह्याबाहेरीत 186 अशा एकूण 654 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद आहे. तसेच 576 रुग्ण स्वाईन फ्लू ला हरवून सुखरूप घरी पोहोचणे ही सुखद बाब असून वेळीच सतर्कता दाखवून वैद्यकीय उपचार घेतल्यास स्वाईन फ्लू वर मात करणे शक्य आहे.

सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement