नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या अनुषंगाने पूर्व नागपुरात भारतीय जनता पार्टीतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
पूर्व नागपुरातील सी.ए. रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमदार कृष्णा खोपडे व भाजपा प्रदेश सचिव तथा प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहर महामंत्री बाल्या बोरकर, चेतना टांक, मनीषा धावडे, कांता रारोकर, जे.पी. शर्मा, सुधीर दुबे, नरसी पटेल, महेंद्र राऊत, अजित कैशल, इंद्रजीत वासनिक, चंदन गोसावी, नामदेव ठाकरे, वैशाली फुलझेले, बाळा वानखेडे, अविनाश ठोसर, संजय वानखेडे, अभय मोदी, नरेश चिरकारे, आशिष मर्जिवे, सुनील आकरे, प्रवीण कांबळे, कपिल मेश्राम, अनिकेत शेंडे, कुंदन नितनवरे, रुपेश मेश्राम, विजय ढोले, आशाबाई बोरकर, विशाल कोल्हापुरे, मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते.