Published On : Tue, Feb 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपातर्फे भोईपुरा येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर

नागपूर : पैशाअभावी आणि सोयीअभावी कुणीही उपचारापासून वंचित राहू नये यासाठी नागपूर शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून शहरात मार्च पर्यंत १०७ महापौर आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. याच शृंखलेतील एक शिबीर समाजसेविका स्व. तुळसाबाई पन्नालाल गौर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भोईपुरा येथे राहणाऱ्या राजेश पन्नालाल गौर यांच्या निवास्थानी सोमवारी (ता. ७) महापौर आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला.

या निशुल्क आरोग्य शिबिराचे उदघाटन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. यावेळी नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक, मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या शिबिरात हृदय रोग, कर्करोग, टीबी, मधुमेह, मलेरिया, फायलेरिया, डोळे यासोबतच अन्य सामान्य रोगांची तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीसुद्धा करण्यात आली. आवश्यक त्या व्यक्तींना मोफत औषधी वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांचे डॉक्टर, डिजिटल एक्सरे, ईसीजीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली.

आरोग्य तपासणीत टीबीचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शेवटपर्यंत मोफत औषोधोपचार करण्यात येणार आहेत. सोबतच कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय मनपातर्फे मोतीबिंदूची शस्त्रक्रियासुद्धा मोफत करून देण्यात येणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली. यापुढे होणाऱ्या सर्व आरोग्य शिबिरांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी महापौरांनी केले.

शिबिरात अजय गौर, राजेश गौर, कृष्णा गौर, शेखर नायक, जगदीश चौधरी, विनोद गौर, अमोल कोल्हे, प्रशांत गुप्ता, सुमित चौधरी, प्रशांत गौर, प्रल्हाद नायक, जितेंद्र श्रीवास्तव, अनिल गुप्ता, विवेक गौर, दिलीप पारधी, मानव गौर, दिलीप भुरे, आनंद नायक, ऋषभ नायक, रवींद्र नायक, सुमित गौर, इरशाद खान, अंकित गौर, शशांक बहोरिया, इशांत गौर, सुजल नायक, अभिषेक नायक आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement