नागपूर: विदर्भ सोशल व्हॉलिंटिअर्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी (ता.८) महाल लाकडीपूल येथील अण्णाभाऊ साठे अध्ययन कक्ष येथे आयुष्यमान भारत योजना आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी व आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, आरोग्य समिती सभापती संजय महाजन, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक मनोज चाफले, नगरसेवक राजेश घोडपागे, नगरसेविका वंदना यंगटवार, शिबिराच्या संयोजिका निकिता मनीष पराये, नागपूर शहर भाजपा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे, मध्य नागपूर भाजपा महामंत्री सुबोध आचार्य, विनायक डेहनकर, मध्य नागपूर भाजपा महिला अध्यक्ष रेखा निमजे, वार्ड अध्यक्ष आशिष भूते, पवन घाटोडे, अनीता काशीकर, भारती अरमरकर, नीरजा पाटील, कल्पना मानापूरे, सरोज पेशकर, वर्षा पेकडे, रजनी जैन, ललित जिभकाटे, योगेश कठाळे, दीपाली फेददेवार, कविता खोत, विद्या मस्के, उषा बेले, मनीष वानखेडे, भारत खडसे आदी उपस्थित होते.
दोन्ही शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.