अमरावती: माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या पोटे इंजीनियरिंग कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू.
हे चारही कर्मचारी कॉलेजच्या गेटची रंगरंगोटी करत होते,शिडी काढताना,शिडीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने चारही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.