Published On : Wed, Nov 3rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

ब्रेकडाऊन: कन्हान-९०० मुख्य जलवाहिनी डीपटी सिग्नल रेल्वे फाटका जवळ फुटली

Advertisement

लकडगंज, नेहरू नगर झोन्समधील १६ जलकुंभांचा पाणीपुरवठा आज झाला बाधित, उद्या सकाळी राहणार बाधित…
ब्रेकडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार..

नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वरून शहराकडे येणाऱ्या ९०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी, महारेल च्या कंत्राटदाराने RUB आणि ROB कामा अंतर्गत डीप्ती सिग्नल रेल्वे फाटक , वर्धमान नगर जवळ फोडली आणि त्यामुळे जलवाहिनीवर मोठी गळती निर्माण झाली आहे.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात सगळीकडे दिवाळी चा उत्साह असल्यामुळे ह्या गळतीला लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे काम नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी तातडीने सुरु केले आहे. उद्भवलेली हि मोठी गळती दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या गळती ची दुरुस्ती करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र १३०० आणि ६०० ह्या दोन्ही जलवाहिनी चे पम्पिंग बंद करण्यात आलेले आहे.

या कामांमुळे लकडगंज आणि नेहरू नगर झोन्समधील १६ जलकुंभांचा पाणीपुरवठा आज नोव्हेंबर २ ला दुपारी आणि संध्याकाळी पाणी पुरवठा असलेल्या भागांना पाणीपुरवठा झाला नाही आणि तसेच नोव्हेंबर ३ ( बुधवारी) सकाळचा पाणी पुरवठा देखील बाधित राहण्याची शक्यता आहे. ह्या अचानक निर्माण झालेल्या ब्रेक डाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

या ब्रेक डाऊन – कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान जवळपास लकडगंज आणि नेहरू नगर, झोन्समधील १६ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर संपूर्णपणे लवकरात लवकर गळती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नरत असल्यामुळे ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती आहे कि त्यांनी सहकार्य करावे.

Advertisement
Advertisement