Published On : Thu, Jul 1st, 2021

पूर्व आणि दक्षिण नागपूरात वृक्षारोपणाचा शुभारंभ

Advertisement

७५ ऑक्सीजन झोन तयार करण्याचे अभियान : महापौरांची संकल्पना

नागपूर, : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त नागपूर शहरात ७५ ऑक्सीजन झोन तयार करण्याची महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांची संकल्पना आहे. या अनुषंगाने पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर भागात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करुन ऑक्सीजन झोन तयार करण्याच्या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. महापौर श्री. तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे यांनी याची गुरुवारी (१ जुलै) रोजी सुरुवात केली.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौरांच्या पुढाकाराने प्रभाग ३० उमरेड रोड येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालया समोरील एका लहान मुलीच्या हातूप खुल्या मैदानावर एक हजार वृक्ष लावण्याच्या अभियानाला आरंभ करण्यात आला.. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर,विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त विकासकुमार, माजी स्थायी समिती सभापती विजय झलके, स्थापत्य समिती सभापती राजेन्द्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नेहरुनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक डॉ.रविन्द्र भोयर, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेवक नागेश सहारे, नगरसेविका उषा पॅलेट, नगरसेविका रीता मुळे उपायुक्त रवीन्द्र भेलावे आदी उपस्थित होते. येथे कडूनिंब, करंजी, पिंपळ व कदम यासारखे प्राणवायु देणारे १००० वृक्ष लावण्यात येणार आहे.

यावेळी महापौर श्री. दयाशंकर तिवारी म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेतर्फे ७५ ऑक्सीजन झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व ७५ ऑक्सीजन झोन तयार करण्यात येईल. याची सुरुवात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गांधीबाग उद्यानातून झाली. त्या दिवशी उद्यानात प्राणवायू देणा-या तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. याचा दुसरा टप्पा म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रभाग २६, प्रभाग २४ आणि प्रभाग २८ येथे सुध्दा वृक्षारोपणाची सुरुवात झाली. मनपातर्फे पिंपळ, वड, कडूलिंब, कदम वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मनपातर्फे पाच हजार पिंपळ आणि पाच हजार वडाचे वृक्ष लावण्याचा संकल्प आहे. तसेच बुध्द विहारात बोधीवृक्षाची लागवड करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, रेल्वे लाईन च्या पलीकडे मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. विशेष रुपाने फळांची वृक्ष लावण्यात येईल जेणेकरुन तेथे पक्षांचा मोठया प्रमाणात संचार होईल आणि जैवविविधताही साधता येईल.

तदनंतर प्रभाग २४ मिनीमाता नगर पाण्याची टाकी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार कृष्णा खोपडे, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सरिता कावरे, अनिल गेंडरे, माजी नगरसेविका अनीता वानखेडे, अजय तारोडकर, नंदू अहीर, संदीप धाकनकर, शंकर गौर, बाला वानखेडे, बाळू शिंदे, उमेश प्रधान, मेघराज सेलुकर व बंटी वैद्य उपस्थित होते. येथे २०० कडूलिंबाचे व जांभूळ, चाफा, आपटयाची सुमारे ५० वृक्ष लावण्यात येतील. प्रभाग २८ मध्येही रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, माजी स्थायी समिती सभापती पिंटू झलके, देवेन्द्र दस्तुरे उपस्थित होते.

इंद्रादेवी टाऊन, नंदनवन प्रभाग २६ येथील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, परिवहन समितीचे सदस्य बंटी कुकडे, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, अनंता नागमोते उपस्थित होते. येथे करंजी, कडूनिंब, कदम, बांबू, बड, पिंपळ, आवळा आदी २०० वृक्ष लावण्यात येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement