Published On : Sat, Nov 21st, 2020

रेशीमबाग मैदानावरील ट्रॅक केला समतल

नगरसेवक नागेश सहारे यांचा पुढाकार : तीनही स्पोर्टस्‌ क्लबचे सहकार्य

नागपूर: कोरोनाच्या काळात फिरण्याची सवय तुटलेल्या नागरिकांसाठी उद्याने अद्यापही बंद आहेत. जी मैदाने खुली आहेत, त्यांची अवस्था वाईट आहे. हे लक्षात घेऊन मनपाचे माजी क्रीडा सभापती नगरसेवक नागेश सहारे यांनी पुढाकार घेत रेशीमबाग मैदानावरील ४०० मीटरच्या ट्रॅकवर रोलर फिरवून तो समतल केला.

Gold Rate
10 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,600 /-
Gold 22 KT ₹ 1,01,900 /-
Silver/Kg ₹ 1,25,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामुळे आता मैदानावर फिरायला येणाऱ्या नागरिकांना तेथून वॉक करणे सोयीचे झाले आहे. नागेश सहारे यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. आई फाऊंडेशन आणि मनपाच्या माध्यमातून ते अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतात. खेळाडूंसाठी क्रीडाविषयक अनेक उपक्रम ते राबवितात. अनेक सोयी त्यांनी खेळांडूंना उपलब्ध करून देण्यासाठी पुढकार घेतला.

कोरोनाच्या काळात रेशीमबाग मैदानाकडे दुर्लक्ष झाले. उद्याने अद्यापही बंद आहेत. त्यामुळे पसिरातील नागरिक फिरण्यासाठी रेशीमबाग मैदानाचा वापर करतात. मात्र या मैदानाचा सुमारे ४०० मीटरचा ट्रॅक समतल नसल्याने चालताना अडचणी येतात. काही नागरिकांनी ही व्यथा नगरसेवक नागेश सहारे यांना सांगितली. याची तातडीने दखल घेत नागेश सहारे यांनी आज रेशीमबाग मैदानाच्या ४०० मीटर ट्रॅकवर रोलर फिरवून ट्रॅक समतल करवून दिला. यात त्यांना तेथील तीनही स्पोर्टस्‌ क्लबचे तसेच ॲडविन ॲन्थोनी, अमित बानाईत, प्राची गोडबोले, संजीव भैरे यांचे सहकार्य लाभले. रेशीमबाग मैदानावर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी यासाठी त्यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement