Published On : Mon, Jun 22nd, 2020

ट्रक ची दुचाकीला धडक अपघातात प्रकाश चौरे चा घटनास्थळीच मुत्यु

Advertisement

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील नागपुर बॉयपास पुला जवळ पेंच पटबंधारे टेकाडी वसाहतीलाच लागु न असलेल्या घरून रामटेक ला ड्युटीवर दुचाकीने जात असता मागुन येणा-या दहाचाकी ट्रकने जोरदार धडक मारून झालेल्या अपघातात दुचाकीसह चालक ट्रकच्या आत फसुन लांब ओढत नेल्याने घटनास्थळीच प्रकाश सुर्यभान चौरे याचा मुत्यु झाला.

सोमवार (दि.२२) ला सकाळी ९ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील नागपुर बॉय पास पुलाजवळ पेंच पटबंधारे विभाग वसाहातीलाच लागुन असलेल्या आप ल्या घरून एस टी महामंडळ रामटेक डेपो मध्ये प्रकाश सुर्यभान चौरे वय ३८ वर्ष चालक म्हणुन कार्यरत असुन कामा वर दुचाकी हिरो होंडा पॅशन क्र एम एच ४० ए एच २०९४ ने जाताना मागुन येणा -या दहाचाकी ट्रक क्र सी.जी ०७ सी एं ८४१७ कन्हान वरून बॉयपास चारपदरी महामार्गाकडे जाताना चालकाने आपले वाहन निष्काळजीने व वेगाने चालवुन जोरदार धडक मारल्याने दुचाकीसह चालक ट्रकच्या आत फसुन चारसे मिटर पर्यंत लांब ओढत नेल्याने चालकाचे डोके फुटुन शरिराचा चुराडा होऊन रक्त स्त्राव झाल्याने घटनास्थळीच प्रकाश चौरे यांचा मुत्यु झाला.

Gold Rate
07 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,49,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ट्रकचालक घटना स्थळावरून पसार झाला. माहामार्ग वाह तुक पोलीस उपनिरिक्षक वेदप्रकाश मिक्षा, यशवंत राऊत, जयलाल शहारे, रविन्द्र कामळे, प्रकाश ढोक, राजु वर्मा आदीने पोहचुन क्रेनच्या मदतीने ट्रक उच लुन दुचाकी चालकास बाहेर काढुन कामठी उपजिल्हा रूग्णालयात रवाना केले.

महामार्ग पोलीस व कन्हान पोलीस स्टेशनचे पी एस आय जावेद शेख सह पोलीस कर्मचा-यांनी ट्रक व दुचाकी ताब्यात घेऊन महामार्ग वाहतुक सुरळीत केली. कन्हान पोलीसानी भाऊ गौरव सुर्यभान चौरे यांच्या फिर्यादी वरून ट्रक चालका विरूध्द कलम २७९, ३०४ (अ), १३२ (२) भादंवि, १८४ मोवाका नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Advertisement
Advertisement