Published On : Fri, Apr 10th, 2020

कोरोना संशयित नागरिक विलगीकरणासाठी हॉटेल्स मालकांचा पुढाकार

· सवलतीच्या दरात निवास व भोजन सुविधा

· नागपूर रेसिडेंटल हॉटेल असोसिएशनची सामाजिक बांधिलकी

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर: कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना चौदा दिवस विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येते. विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांचे संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेंटल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहरातील प्रमुख 18 हॉटेलमधील 409 कक्षामध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी आज दिली. कोरोना संसर्गिक बाधित रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी येथील आमदार निवास, रविभवन तसेच वनामती येथे क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच नागरिकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेवून तसेच शहरातील विविध हॉटेल्समध्ये सवलतीच्या दराने विलगीकरण करण्यासाठी आवश्यक निवास व भोजन व्यवस्था करण्याबाबत नागपूर रेसिडेंटल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजंदर सिंग रेणू यांनी मान्य केले असून यासंदर्भातील संमती पत्र विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांना आज दिले.

लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी शहरातील 18 हॉटेल्स विलगीकरणासाठी उपलब्ध होणार असून यामध्ये कमीत-कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने किचनसह सर्व व्यवस्था राहणार आहे. ही सुविधा उपलब्ध करुन देतांना हॉटेल्स तीन प्रकारच्या श्रेणीत विभागण्यात आले आहेत. ‘अ’ दर्जाच्या श्रेणीमध्ये ‘थ्री स्टार’ दर्जाच्या वातानुकूलित हॉटेलचा समावेश असून निवास, भोजन व करासह 24 तासासाठी 1 हजार 500 रुपये भाडे आकारण्यात येईल.

‘ब’ श्रेणीच्या हॉटेलमध्ये वातानुकूलित रुम राहणे, भोजन व करांसह 24 तासासाठी 999 रुपये तर ‘क’ श्रेणीच्या हॉटेलमध्ये चांगल्या दर्जाच्या राहण्याच्या सुविधा व भोजन तसेच करांसह 24 तासासाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. हॉटेलचे भाडे दैनंदिन येणाऱ्या किमान खर्चासाठी असून ही संपूर्ण व्यवस्था कोरोनाबाधित रुग्णांच्या नि:स्वार्थ सेवेच्या भावनेतून करण्यात येत असल्याचे असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.

नागपूर रेसिडेंटल हॉटेल असोसिएशनतर्फे कोरोना संसर्ग संशयित नागरिकांसाठी क्वारंटाईनच्या काळात शहरातील विविध 18 हॉटेलमध्ये उपलब्ध करुन दिलेली व्यवस्था अशी ‘अ’ वर्ग श्रेणी हॉटेल अलझमझम, सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 27, हॉटेल दर्शन टॉवर, गांधी बाग- कक्ष 25, हॉटेल क्लोरा इन, राजीव नगर वर्धा रोड- कक्ष 24, हॉटेल ओरिएंट तल्भ ग्रेट नाग रोड- कक्ष 42 आहेत. या हॉटेलमध्ये सवलतीच्या दरात म्हणजे 1 हजार 500 रुपये शुल्कात व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘ब’ वर्ग श्रेणी गोपाजी गेस्ट हाऊस, टेंपल बाजार रोड सिताबर्डी – कक्ष 12, हॉटेल कनिष्का सिताबर्डी- कक्ष 7, हॉटेल ओरिएंट ग्रॅंड पडोळे कॉर्नर ग्रेट नाग रोड- कक्ष 34, हॉटेल आरएस संत्रा मार्केट रेल्वे स्टेशन- कक्ष 20, हॉटेल शंतनु टेंपल बाजार रोड सिताबर्डी- कक्ष 27 व हॉटेल सुपर डिलक्स गेस्ट हॉऊस सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 20, तसेच ‘क’ वर्ग श्रेणी हॉटेल अमित सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 12, हॉटेल आनंदमहल सिताबर्डी- कक्ष 30, हॉटेल देवनेश टेंपल बाजार रोड सिताबर्डी- कक्ष 10, हॉटेल ओरिएंट स्टार सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 27, हॉटेल प्रितम सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 40, हॉटेल आरएस संत्रा मार्केट रेल्वे स्टेशन- कक्ष 15, हॉटेल सिद्धार्थ इन सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 22 तसेच सुपर डिलक्स गेस्ट हाऊस सेंट्रल एव्हेन्यू- कक्ष 15 असे एकूण 409 कक्ष नागपूर रेसिडेंटल हॉटेल असोसिएशनतर्फे सवलतीच्या दराने उपलब्घ करुन देणार आहे.

Advertisement
Advertisement