नागपूर : लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेले असंघटीत कामगार व गरजू व्यक्तींना मदत म्हणून स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मागासवर्गीय वरिष्ठ अभियंता व अधिकारी संघटना व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी कल्याण निधी मंडळ यांच्यातर्फे प्रत्येकी अडीच लाख याप्रमाणे 10 लाखांचा धनादेश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्द करण्यात आला.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे.एस. पाटील, प्रसिद्धी सचिव एन.बी. जारोंडे, धर्मेश फुसाटे व वाय.डी. मेश्राम यावेळी उपस्थित होते.

 
			


 







 
			 
			
