नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याांच्या संपर्क साधून कोरोना महामारीने उद्भवलेल्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून दिलेल्या निर्देशांचे पालन होत आहे किंवा नाही तसेच केंद्राच्या माध्यमातून आणखी काही मदत किंवा सहकार्याची आवश्यकता काय, याची विचारणा महाराष्ट्रातील जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून करावी असे सांगितले.त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना संदर्भात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या व्यवस्थांचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी तील,अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, धुळे,गडचिरोली, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई या सर्व जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला.
केंद्रीय गृह विभाग आणि केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांची अमलबजावणी होत आहे की काय? अमलबजावणी काही अचडणी आहेत काय अशी विचारणा केली. या सर्व जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था, अन्नपुरवठा, वाहतूक आदींबाबत विद्यमान परिस्थिती जाणून घेतली व आवश्यक ते निर्देश देण्यात आले. केंद्र शासनाकडून मदत आवश्यक असल्यास आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा असेही सांगण्यात आले.
मुंबई व पुणे वगळता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये संपूर्ण स्थिती नियंत्रणात असल्याचे त्या-त्या क्षेत्रातील जिल्हाधिकार्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळ देशात उद्भवलेल्या समस्येच्या निराकरणासाठ़ी जनतेच्या पाठीशी तसेच तत्परतेने कर्तव्य पार पाडणार्या सर्व अधिकार्यांच्या आणि कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.